नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा व इतर योजना काय आहेत ?

पुणे – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना तसेच शैक्षणिक योजना, आरोग्यविषयक तसेच आर्थिक स्वरुपाच्या योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी सामाजिक सुरक्षा योजनांविषयी….(What are the social security and other schemes for registered construction workers?)

सामाजिक सुरक्षा व इतर योजना

  • स्वतःच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी ३० हजार रुपये अर्थसहाय्य.
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना.
  • सुरक्षेसाठी सुरक्षा संच पुरविणे.
  • अत्यावश्यक वस्तू संच पुरविणे.
  • पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना लागू करणे.

संपर्क : अधिक माहिती, नोंदणी, नूतनीकरण, लाभाचा अर्ज करण्याकरिता https://mahabocw.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच अपर कामगार आयुक्त, बंगला क्रमांक-५, मुंबई-पुणे रोड, शिवाजीनगर पुणे- ५, दू. क्र. – ०२०-२५५४२६११/२५५४१६१७ येथे संपर्क साधावा.

संकलन-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.