Narayan Rane | शिंदेंची रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ताकद नाही, मला उमेदवारी दिली तर लढेन आणि जिंकेनसुद्धा

Narayan Rane | महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काही जागांवरुन अद्यापही शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये चर्चा सुरू असल्याचे समजत आहे. अशातच भाजपाचे केंद्रीय मंत्री शिवसेना शिंदे गटाविषयी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ताकद नसून भाजपने उमेदवारी दिली, तर मी लोकसभा निवडणूक लढवीन आणि जिंकून येईन, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटाबरोबर असून शिंदे गटाबरोबर फारसे कार्यकर्तेही नाहीत. उलट भाजपकडे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, अन्य संस्था व आमदार असून मतदारसंघात मोठी ताकद असल्याने ही जागा भाजपच लढवेल. मी आतापर्यंत कधीही कोणाकडे उमेदवारी मागितली नाही. पण या मतदारसंघात भाजपच प्रबळ असल्याने आपला उमेदवार असला पाहिजे, असे मत मी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे मांडले आहे. मी शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याविरोधात नाही. पण मला भाजपने उमेदवारी दिली, तर निश्चित लढेन व विजयी होईन, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती