पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट भारताचा भाग : इंद्रेशकुमार

India vs Pakistan : पाकव्याप्त काश्मीर, कैलास पर्वत, तिबेट हा सारा भारताचा भाग असून पंडित नेहरूंच्या चुकीच्या निर्णयांमुळे या भूभागाला मुकावे लागले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी समितीचे वरिष्ठ सदस्य इंद्रेशकुमार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगीतले.हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला डॉ.परवेझ ग्रँट, अली दारूवाला उपस्थित होते.संसदेवरील हल्ला लोकशाहीविरोधी, मानवताविरोधी आहे.एकमेकांवरील विश्वास कमी होईल, अशा घटना होऊ नयेत, असे मतही इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

भ्रष्टाचारी व्यक्तींना भाजप सोबत घेत आहे, त्यावर संघ काय सल्ला भाजपला देईल, असा प्रश्न विचारल्यावर सार्वजनिक पत्रकार परिषदेत या विषयाची चर्चा करता येणार नाही.जगभर अध : पतन सर्वत्र चालू आहे. चारित्र्य घडण यावर भर देणारे शिक्षण यामुळे भ्रष्टाचार, गुन्हेगारी कमी होऊ शकेल,असे प्रतिपादन इंद्रेशकुमार यांनी केले.’ दो धागे श्रीरामजी के लिए ‘ कार्यक्रमासाठी मी पुण्यात आलो. संघ परिवाराचा एक धागा, भारतीयांचा दुसरा , जगातील नागरिकांच्या वतीने तिसरा धागा मी तिथे विणला , त्यासाठी मी पुण्यात आलो होतो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळानंतर भारत देश जगाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आला.लॉक डाऊनची कल्पना भारताने जगाला दिली.भारतीय काढा तसेच लसीने मानवजातीचे रक्षण केले, उत्तराखंड बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोडविण्यासाठी शेवटी भारताचे जुगाड तंत्र कामी आले, असे विविध दावेही त्यांनी केले.ते म्हणाले, ‘जी -२० परिषद, युक्रेन युद्धात भारताची भूमिका महत्वाची ठरले.दंगलमुक्त भारत, युद्ध मुक्त विश्व व्हावे अशी आमची इच्छा आहे ‘.

सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांवर उपक्रम व्हावेत
12 जानेवारी रामजन्मभूमीवर रामलल्ला विराजमान होत असून त्या दिवशी देशात सर्व धर्म स्थळांवर तेथील रिवाजानुसार पूजा व्हावी, असे आमचे आवाहन आहे. अयोध्येवरून येणारा प्रसाद सर्व गावातील धार्मिक स्थळांवर पोहोचविला जाणार आहे. सर्व शहरे, गावात प्रकाशोत्सव साजरा केला जावा.27 जानेवारी पर्यंत अयोध्या वारी आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती इंद्रेशकुमार यांनी दिली.

संघ परिवार ताकदीनिशी हे सर्व कार्यक्रम यशस्वी करेल. देशाच्या विभाजनाचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.काँग्रेसच्या काळात अनेकदा घटना दुरुस्ती झाली.अटलजींच्या,मोदींच्या काळात घटनादुरुस्ती झाली नाही, त्यामुळे संघ परिवार संविधान विरोधी आहे, असा आरोप करणे चुकीचे आहे,सामाजिक अन्याय जाईपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे, आर्थिक मुद्यावर आरक्षण दिल्यावर सामाजिक अन्याय लवकर दूर होईल,असे आमचे मत आहे. असेही इंद्रेशकुमार यांनी सांगीतले.

महत्वाच्या बातम्या-