लातूर – कोरोनाचा डेल्टा पेक्षा घातक ओमीक्रॉन व्हेरीएंट दक्षिण आफ्रिकेसह इतर काही देशात सापडला असून या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. लातूर जिल्हा प्रशासनानेही अत्यंत दक्ष राहून या संदर्भाने जाहिर करण्यात आलेले मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करावे, जिल्हयात या प्रकारतील व्हेरीएंटचा शिरकाव होणार नाही यादृष्टीने उपाययोजना आखाव्यात असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेसह जगातील इतर काही देशामध्ये कोरोनाचा घातक ओमीक्रॉन व्हेरीएंट आढळल्याच्या पार्श्वभुमिवर महाराष्ट्रात विशेष काळजी घेण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. या संदर्भाने गठीत असलेल्या टास्क फोर्सने नव्याने काही माग्रदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत.
या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन होण्याच्या संदर्भाने लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून निर्देश दिले आहेत. अलीकडच्या काळात बाहेर देशातून लातूर जिल्हयात कोणी प्रवासी आले असतील त्यांची माहिती जमा करावी, त्या प्रवाशांनी प्रवास केलेल्या देशासंदर्भात माहिती घ्यावी, या प्रवाशांमध्ये ताप, सर्दी, खोकला अशी लक्षण असल्यास तातडीने त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी, बाहेर देशातून नव्याने जिल्हयात येणाऱ्या नागरिकावर लक्ष ठेवावे, त्यांची आवश्यकतेनूसार तपासणी करावी. त्यांना विलगीकरणात ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्हयातील लसीकरण मोहिमेला गती दयावी. लस न घेणाऱ्या नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावे. १८ ते २० वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्यावर भर द्यावा, शाळा महाविद्यालय सुरू होत आहेत त्याठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखाव्यात आदी सूचना या पत्रातून करण्यात आल्या आहेत.
गर्दीत जाणे / प्रवास करणे टाळावे
नव्या ओमीक्रॉन व्हेरीएंटमूळे संभाव्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन यासर्व ठिकाणी कोवीड१९ मार्गदर्शक सुचनांचे कटाक्षाने पालन होणे गरजेचे आहे. कोणत्याच ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. या संदर्भाने प्रशसनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. शारीरीक आंतर पाळणे, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे या बाबतीत जनतेने विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, शक्यतो गर्दीतील संपर्क टाळावा, वृध्द आणि ज्येष्ठ नागरिक, लहान मुले घरीच राहतील यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी असे आवाहनही ना. अमित देशमुख यांनी केले आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू ठेवाव्यात
कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभुमिवर नागरीकांमधील भिंती कमी झाली असून प्रशासकीय व आरोग्य यंत्रणांच्या कामकाजात शिथीलता आल्याचे दिसून येत आहे. नव्या ओमीक्रॉन व्हेरीएंटच्या पार्श्वभुमिवर आता पून्हा सर्वांनी सतर्क होणे गरजेचे आहे. तज्ज्ञ मंडळीचा इशारा लक्षात घेऊन लातूर जिल्हयासह प्रशासन, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महापालीका, नगरपालीका इतर संस्था आणि आरोग्य यंत्रणेने दक्षता घेतानाच, सार्वजनिक ठिकाणी शारिरीक आंतर पाळले जाईल, मास्क सॅनिटायझर वापर होईल याचे नियोजन करावे. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या इतरही प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू कराव्यात, उपचाराच्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात असे निर्देशही पालकमंत्री ना. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या या पत्राव्दारे दिले आहेत.
ओमीक्रॉनमुळे कोरोनाची सभाव्य तिसरी लाट येईल ही शक्यता लक्षात घेऊन जिल्हयात सर्वांना वेळेत चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये व इतर रूग्णालयाच्या ठिकाणी वाढीव बेड, औषधे, उपकरणे उपलब्ध करून ठेवलेले आहेत, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर याची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करून ठेवलेले आहे या नियोजनाची फेरतपासणी करून सर्व यंत्रणांना सतर्क करावे असे निर्देश देणारे पत्र पालकमंत्री ना. देशमुख यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकरी अभिनव गायेल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखील पिगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकीत्सक लक्ष्मण देशमुख यांना पाठविले आहेत.
https://youtu.be/FkhUTw1OjTM