Nashik Bus Accident : नाशिक येथे बसमध्ये अग्नितांडव, 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, 38 जण जखमी

नाशिक – औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने घटनास्थळावरून हलविण्यात आली. यावेळी लहान बाळासह दोन मृतदेह आढळल्याने मृतांचा आकडा १३ वर गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळच्या (Yavatmal Bus accident) पुसदहून मुंबईच्या दिशेने चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या (Chintamani Travels) बसने प्रवासी मुंबईच्या दिशेने निघाले. ही बस नाशिकच्या मिरची हॉटेलजवळ आली आणि तिचा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी आणि औरंगाबादच्या दिशेने जाणारा डंपर यांच्यात अपघात (Nashik Bus Accident) घडला. अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर बसला आग लागली.(Nashik Bus Accident news )

आगीचा भडका क्षणात संपूर्ण बसच्या भोवती पसरला. संपूर्ण बसला आगीने आपल्या कवेत घेतलं आणि प्रवाशांना जीव वाचण्यासाठी संधीही मिळाली नाही. दरम्यान, या अपघातामध्ये 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.