शिवसेनेच्या ‘या’ झुंजार खासदाराला झाली कोरोनाची लागण

नाशिक – राज्यासह देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलेब्रेटी, खेळाडू, तसेच राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका मागोमाग एक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.

राज्यातले १२ हून अधिक मंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना गेल्या काही दिवसात करोनाची लागण झाली आहे. करोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल खोकला जाणवत असल्याने केली होती चाचणी आज रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

दरम्यान, राज्यातली रुग्णसंख्या चिंताजनक असून त्यात दररोज मोठी वाढ होत आहे. देशातलं चित्रही फारसं वेगळं नाही. देशातली रुग्णवाढ पाहिली असता परिस्थिती गंभीर आणि काळजी करण्यासारखी असल्याचं दिसून येतं.

या नेत्यांना झाली आहे कोरोनाची लागण

केंद्रीय मंत्री भारती पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,आदिवासी मंत्री के. सी. पाडवी,ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,खासदार सुप्रिया सुळे,आमदार सागर मेघे,आमदार राधाकृष्ण विखे पाटील,आमदार शेखर निकम, आमदार इंद्रनील नाईक,आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर),आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री दिपक सावंत,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे,रोहित पवार,धीरज देशमुख.