Nationalist Congress | निवडणुकीचे वातावरण जसजसे तयार होईल तसतसे महायुतीचे मताधिक्य वाढलेले दिसेल

Sunil Tatkare   – दिंडोरी, नाशिकसह राज्यातील ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) जनाधार आहे तिथे आपण निवडणूक लढावी अशी भावना कार्यकर्त्यांनी लोकसभा आढावा बैठकीत बोलून दाखवल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Nationalist Congress) आज आणि उद्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत घेतला जात आहे. आज पहिल्या दिवशी सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये नाशिक दिंडोरी, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशीव, रायगड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

रायगड लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याचे निश्चित झाले असून रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, शिवसेना नेते रामदास कदम अशा शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्टपणे ही भूमिका मांडली असल्याचेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करतानाच ४५+ चा निर्धार करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. निवडणुकीचे वातावरण जसजसे तयार होईल तसतसे महायुतीचे मताधिक्य वाढलेले दिसेल असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

बारामती लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. ही जागा राष्ट्रवादीने लढण्यावर महायुतीत निश्चित झाल्यास सौ. सुनेत्रा अजित पवार या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले. गेल्या ४० वर्षांत अजितदादांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल असेही ठामपणे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान