बिग ब्रेकिंग: शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा!

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा (Sharad Pawar Resigning) केली आहे. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे.

त्यांच्या या घोषणेनंतर आता शरद पवार हे पद कोणाच्या हाती देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. किंबहुना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडेही प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. त्याचवेळी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या पवारांच्या उत्तराधिकारी मानल्या जातात. अशा स्थितीत पक्षाध्यक्षपदाची लढाई आगामी काळात रंजक ठरू शकते.