संभाजी ब्रिगेडच्या राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा ‘देवगिरी’वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Sambhaji Briged: – संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आजी – माजी कार्यकर्त्यांनी आज अजित पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  जाहीर प्रवेश केला. दरम्यान अजित पवारच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा यावेळी पार पडला.

संभाजी ब्रिगेड संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सहभागी होण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार मानत अजितदादांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. संभाजी ब्रिगेड संघटनेची ओळख ही ‘विचारांसाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना’ अशी आहे. हा आक्रमकपणा योग्यठिकाणी वापरून त्यातून जनहिताची कामे आपल्याला करायची असल्याचे अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस ही आज महायुतीसोबत सत्तेत सहभागी असली तरी शिव – फुले – शाहू – आंबेडकर यांची बहुजनवादी विचारधारा पुढे घेऊन जात असल्याचे यावेळी अजित पवार म्हणाले.आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करायचे आहे. यासाठी एकमेकांना निश्चित मदत करू असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, तसेच संभाजी ब्रिगेड संघटनेचे मान्यवर मंडळी उपस्थित होती.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन