शिंदेंनी ठाकरे गटाची केली धुलाई; म्हणाले, पराभव दिसायला लागल्यावर…

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज निकाल देणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. सोबतच अनेक दावे प्रतिदावे देखील केले जात आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

निकाल विरोधात लागला की यांची टीका सुरू…आरोप करणारे अकलेचे तारे पाजळतात…ठाकरे गट घटनाबाह्य आहे अशी टीका करत ठाकरे गटाची शिंदे यांनी धुलाई केली आहे. ते म्हणाले, पराभव दिसायला लागल्यावर पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र वर्ष बदललं तरी सरकार कायम, मुख्यमंत्री कायम…सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार या डेडलाईन दिल्या…ठाकरे गटालाही आमचाच व्हिप लागू…मेरिटनुसार निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगानं आम्हाला अधिकृत मान्यता दिली. धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं आम्हाला दिलं. बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगानं आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिले आहे. विधानसभेमध्ये 67 टक्के बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकसभेमध्ये 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. सिम्बॉलही आम्हाला दिलेला आहे असं देखील शिंदे यांनी सांगितले आहे.