‘कधी जीभ, कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करतंय… पुणेकर तुमचा माज उतरवणार’

पुणे : शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केली होती. त्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर पडले. आज पुन्हा किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर येत असून त्यांचा भाजपाकडून त्याच पायऱ्यावर सत्कार होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर खोचक शब्दात टीका केली आहे.

पुण्यात कोण पायरी सोडतय. स्मार्ट सिटी आणि विकासातुन पुणेकरांचा सन्मान व्हायला हवा होता. पण कधी जीभ तर कधी पाय घरसणाऱ्याचा भाजप सत्कार करतय. पुणेकरांची काय थट्टा लावलीय ! पुणेकर तुमचा माज उतरवणार. असं ट्विट रूपाली पाटील यांनी केले आहे. त्यामुळे आज आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या हे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. ज्याठिकाणी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याठिकाणी महापालिकेच्या पायऱ्यांवर भाजपातर्फे किरीट सोमय्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर कॉंग्रेसने किरीट सोमय्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी महापालिकेची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश प्रशासनकडून देण्यात आले आहेत.

किरीट सोमय्या हे पालिका आयुक्तला भेटण्यासाठी शनिवारी महानगरपालिकेत आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली असता, ते पालिकेच्या पायऱ्यांवर पडले होते. तेव्हा संपूर्ण महापालिकेत गोंधळाचं चित्र निर्माण झाले होते. या झालेल्या प्रकरणानंतर किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांनावर गुन्हा दाखल केला. नंतर पुणे पोलिसांनी शिवसैनिकांना केली व त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. या प्रकरणानंतर महापालिका आवारात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.