राम शिंदे याचं जोरदार पुनरागमन; रोहित पवारांना धक्का देत जिंकल्या तीन ग्रामपंचायती 

कर्जत – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायतीचे निकाल समोर आले आहेत. त्यात रोहित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

रोहीत पवार आमदार असलेल्या कर्जत-जामखेडमध्ये भाजपने विजयी घोडदौड सुरू केली आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायती राम शिंदे यांच्या ताब्यात आल्या आहेत. विधान परिषदेवर निवडून येताच राम शिंदे यांनी कर्जत-जामखेड पंचायत समितीत परिवर्तन घडवत करून दाखवलं आहे. कर्जत जामखेड पंचायत समितीचा निकाल हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

राज्यात सत्ता परिवर्तन होताच ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांना धक्का बसला आहे. कर्जत तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायत राम शिंदे गटाकडे आल्या आहेत, तसा दावा राम शिंदे यांनी केला आहे. भाजपचे कोरेगावमध्ये 13 पैकी 7, बजरंगवाडीत 7 पैकी 5 आणि कुळधरणमध्ये (बिनविरोध)13 पैकी 7 सदस्य विजयी झाले आहेत.