मोका चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ‘या’ राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा

नवी दिल्ली – मोका हे चक्रीवादळ (Cyclone Mocha) आणखी तीव्र झालं असून आज पहाटे हे चक्रीवादळ पोर्ट ब्लेयरच्या पश्चिम वायव्येस साधारण 520 किलो मीटर अंतरावर बंगालच्या उपसागराच्या मध्य क्षेत्राकडे सरकलं आहे. हे चक्रीवादळ ताशी 150 ते 160 किलोमीटर वेगानं म्यान्मा आणि बांग्लादेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार बेटं, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड, मणिपूर आणि आसामच्या दक्षिण भागात आजपासून पुढचे दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.