स्मार्टफोन ऐकतो तुमच्या बेडरुमधील गप्पा, त्वरित ऑफ करा ‘ही’ सेटिंग नाहीतर बोंब होईल!

बदलत्या जगासोबतच स्मार्टफोनचा (Smartphone) वापरही वाढला आहे. स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की, गुगल किंवा अॅपल आमचे बोलणे ऐकतं का? तर उत्तर होय असे आहे… तुम्ही फोन वापरत नसला तरीही तुमचा स्मार्टफोन तुमच्या गप्पा ऐकतो. फोन वापरताना नकळत आपण कॅमेरापासून ते माइकपर्यंत सर्व सेटिंग्जला परवानगी देतो. परवानगी देताना ते डिवाइस कधी आणि कसा याचा वापर करेल?, याचा विचार आपण करत नाही. (Change Voice Access Setting)

मायक्रोफोनला परवानगी देण्यापूर्वी काळजी घ्या
गुगल व्हॉइस असिस्टंटसाठी, वापरकर्त्याला मायक्रोफोनची परवानगी द्यावी लागेल. यामुळे व्हॉईस असिस्टंट युजरच्या आवाजासोबत काम करतो, Amazon Alexa प्रमाणे. Alexa चे नाव घेऊन जे काही सांगितले जाते, त्याला अलेक्सा उपकरण प्रतिसाद देते. त्याचप्रमाणे गुगल व्हॉईस असिस्टंट देखील आपले शब्द ऐकतो. फोनमध्ये व्हॉइस टू स्पीच हे फिचर वापरण्यासाठी मायक्रोफोन वापराची परवानगी द्यावी लागते.

फेसबुकही मायक्रोफोनची परवानगी मागतं
फेसबुकही वापरकर्त्याकडून मायक्रोफोनची (Microphone) परवानगी मागते. टॅप टू स्पीच आणि व्हिडिओ चॅटिंगसाठी अॅप त्याची परवानगी मागते. अनेकदा आपण विचार न करता मायक्रोफोन वापरण्याची परवानगी देतो. पण यामुळे तुमचा स्मार्टफोन तुमच्या वैयक्तिक गोष्टीही ऐकू शकतो. परंतु यामुळे घाबरून जाऊ नका, त्यातून सुटका करण्याचाही एक मार्ग आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया… (How to Stop Your Phone From Listening to You)

Android वापरकर्त्यांनी काय करावे?

  1. सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा.
  2. सेक्युरिटी आणि प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
  3. त्यानंतर प्रायव्हसी ऑप्शनवर जा.
  4. येथे तुम्हाला मायक्रोफोन, कॅमेरा आणि इतर सेन्सर्सची माहिती मिळेल.
  5. तुम्ही कोणत्या अॅपला परवानगी दिली आहे हे येथे तुम्ही शोधू शकता.
  6. तुम्ही येथून अॅपला दिलेली परवानगी ब्लॉक करू शकता किंवा काढून टाकू शकता.

आयफोन वापरकर्त्यांनी काय करावे

  1.  सेटिंग्जमध्ये जा.
  2. सेक्युरिटी आणि प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
  3. तेथे तुम्हाला मायक्रोफोनचे लेबल दिसेल.
  4. त्यावर क्लिक करून, ज्या अॅपमध्ये तुम्हाला मायक्रोफोन नको आहे, त्या अॅपवर क्लिक करून तुम्ही काढून टाकू शकता.