‘सहकार विभागाने अपात्र घोषित केलेल्या प्रविण दरेकरांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा’

मुंबई : सहकार विभागाने अपात्र घोषित केलेले…लोकांची फसवणूक करणारे…स्वतःला मजूर म्हणवणारे… आणि प्रतिज्ञापत्रात उद्योजक दाखवणार्‍या प्रविण दरेकर यांना सार्वजनिक पदावर राहण्याचा अधिकार नसल्याने त्यांनी तात्काळ विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मुंबै बॅंक निवडणूकीत स्वतःला मजुर म्हणायचं व विधानपरिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उद्योजक असल्याचं दाखवायचं अशी धुळफेक फक्त भाजपचे नेते प्रविण दरेकरच करु शकतात असा थेट आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

केंद्रात सहकारमंत्री व गृहमंत्री अमित शहा आहेत. राज्याच्या सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र घोषित केले आहे. आता दरेकर कुठली नैतिकता वापरणार आहेत. भाजप पक्षाचा एक जबाबदार नेता जनतेच्या व प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असेल तर भाजपकडे नैतिकता कुठे आहे असा थेट सवालही महेश तपासे यांनी केला आहे.