Vasant More | पवारांसोबतची ‘ती’ दोन मिनिटांची भेट निर्णायक ठरली? वसंत मोरे आता शरद पवार गटात जाणार का?

Vasant More Resigns | काही दिवसांपूर्वीच मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या मनसेतून बाहेर पडण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच आता वसंत मोरेंनी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा (Pune Vasant More Resignation) राजीनामा दिला आहे. पक्षात होणाऱ्या घुसमटीमुळे आपण राजीनामा देत असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शरद पवारांची (Sharad Pawar) दोन मिनिटांची ती भेट निर्णायक ठरली का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बारामती लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला अचानक वसंत मोरे यांनी उपस्थिती लावली. शरद पवारांसोबत दोन मिनिटे चर्चा करून ते निघून गेले. ही भेट सामाजिक कामासाठी असल्याचं वसंत मोरे यांनी जरी सांगितलं असलं तरी त्या दोन मिनिटांच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा झाली का? वसंत मोरे हे शरद पवरांसोबत जाणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य