कृषि पर्यटनासाठी शासनाची योजना काय आहे? 

कृषि पर्यटनासाठी शासनाची योजना काय आहे?

कृषि पर्यटनासाठी अटी:
■ कृषि पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी किमान १ एकर शेती क्षेत्र असणे, सात-बारा कुटुंबाच्या नावे असणे आवश्यक.
■ पर्यटकांना भोजन, पाणी, स्वच्छतागृहाची सोय आदी उपलब्ध करुन देणे बंधनकारक
■ क्षेत्रफळानुसार खोल्यांची संख्या निर्धारीत आहे. कृषि पर्यटन हे एकदिवसीय सहल, निवासी, शिबीर (कँपिंग) आदी पद्धतीचे ठेवता येईल.
■ अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासोबत जमिनीचा सात-बारा, ८ अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीजबील, अन्न परवाना (फूड लायसेन्स) व चलन ही कागदपत्रे देणे आवश्यक.

कृषि पर्यटन केंद्रास मिळणारे लाभ:
■ पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.
■ केंद्र मालकास नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे बँक कर्ज प्राप्त करता येऊ शकेल.
■ पर्यटन धोरण २०१६ मधील प्रोत्साहनांचा उदा. वस्तू व सेवा कर, विद्युत शुल्क (मुद्रांक शुल्क सवलत वगळता) आदींचा लाभ घेता येईल.
■ जलसंधारण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शेततळे योजनेकरिता कृषि पर्यटन केंद्रास प्राधान्य देण्यात येईल.
■ केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यासारख्या योजनांचे फायदे घेता येतील.
■ कृषि पर्यटन धोरणांतर्गत ज्या ठिकाणी घरगुती स्वयंपाकगृह वापरले जाईल त्या ठिकाणी केंद्रांना निवास व न्याहारी योजनेच्या धर्तीवर घरगुती गॅस जोडणी वापरता येईल.
■ वीज आकारणी घरगुती दराप्रमाणे आकारण्याबाबत विचार करण्यात येईल.

संपर्क : पर्यटन संचालनालय, विभागीय पर्यटन कार्यालय, आय बरॅक, सेंट्रल बिल्डिंग,पुणे स्टेशन, पुणे. दुरध्वनी क्र. ०२०-२९९००२८९, ८०८००३५१३४.