सिस्का अ‍ॅक्सेसरीजतर्फे नवे सिस्का EB0865 इयरग्रुव्ह्ज लाँच; नव्या सिस्का इयरबड्ससह अनुभवा नवा ताल

मुंबई  – सिस्का अ‍ॅक्सेसरीज या भारतातील मोबाइल अ‍ॅक्सेसरीज क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने नवे सिस्का इयरग्रुव्ह्ज लाँच केले आहेत. सिस्का इयरग्रुव्ह्जमध्ये टच सेन्सर्स आणि रोबस्ट बास देण्यात आले आहेत, शिवाय त्यांची कामगिरी ध्वनीचा उत्तम अनुभव देणारी असते.

आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक ध्वनी दर्जा आणि दीर्घकाळ वापरतानाही मिळणारा आरामदायीपणा या वैशिष्ट्यांमुळे सिस्का इयरग्रुव्हज अधिक दर्जेदार झाले आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या या इयरग्रुव्ह्जचा उच्च दर्जाचा ध्वनी सुस्पष्ट आहे. त्याशिवाय यातील इनबिल्ट ५.१ ब्लुटुथमुळे कोणत्याही उपकरणासह इयरग्रुव्ह्ज सहजपणे पेयर करता येते. महत्त्वाचे म्हणजे, केवळ दहा मिनिटांच्या चार्जिंगमध्ये हे इयरफोन्स १२० मिनिटांचा प्लेटाइम देतात. इतकेच नाही, तर या इयरबड्स केसमध्ये २००० एमएएच पॉवरबँक देण्यात आली आहे. चार्जची गरज असतानाही इयरग्रुव्ह्ज परिपूर्ण व दर्जेदार अनुभूती देतात.

सिस्का इयरग्रुव्हजच्या लाँचविषयी सिस्का समूहाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योत्स्ना उत्तमचंदानी म्हणाल्या, ‘वायरलेस ऑडिओ क्षेत्रात सिस्का इयरग्रुव्हज लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे, कारण या बाजारपेठेत देशभरात मागणी दिसून येत आहेत. हे इयरग्रुव्हज तंत्रज्ञान, डिझाइन आणि दर्जाचा योग्य मेळ असून सक्रिय जीवनशैली जगणाऱ्यांना ते आकर्षक अनुभव देतात. सिस्कामध्ये आम्ही सातत्याने ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जा असलेल्या व कंटेटचा अनोखा अनुभव देणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज तयार करण्यावर भर देतो.’

सिस्का इयरग्रुव्हजची महत्त्वाची वैशिष्ट्ये

अत्युच्च ध्वनी दर्जा (Excellent sound quality)  – दर्जेदार ध्वनी वैशिष्ट्यांसह सिस्का इयरग्रुव्हज युजर्सना संगीताचा अनोखा आनंद (एकंदरीत) १५ तासांसाठी देतात. इयरग्रुव्हजना चार्ज होण्यासाठी ४५ मिनिटांचा वेळ लागतो आणि चार्जिंग केसमध्ये चार्जिंगसाठी सहा ते सात तासांचा वेळ लागतो. (इनबिल्ट २००० एमएमएच पॉवरबँकमुळे, चार्जरच्या वापरावर अवलंबून*)

चार्जिंग केस – २००० एमएमएच चार्जिंग केसमध्ये इयरबड्स चार्ज करण्यासाठी चार पट जास्त उर्जा मिळत असल्यामुळे संकटाच्या वेळेस फोन चार्ज करण्यासाठी अतिरिक्त साधन म्हणून त्याचा वापर करता येऊ शकतो.

डिजिटल बॅटरी पर्सेंट डिस्प्ले (Digital battery percentage display) – आकर्षकपणे डिझाइन करण्यात आलेल्या इयरग्रुव्ह्जमध्ये डिजिटल बॅटरी पर्सेंट डिस्प्ले देण्यात आला आहे.

कॉग्निझंट अ‍ॅक्टिव्ह टच सेन्सर (Cognizant Active Touch Sensor) – या वैशिष्ट्यामुळे युजरला कंट्रोल पॅनेलवर टच सेन्सरला स्वाइप आणि टॅप करून आवश्यक त्या गोष्टी करता येतात.

वन टॅप गुगल असिस्टंट (One tap Google Assistant)  – हे इयरग्रुव्हज गुगल असिस्टन्सशी सुसंगत आहेत.

सिस्का इयरग्रुव्हज आपला आवडता सिनेमा किंवा सीरीज पाहाण्यात रंगून जाणाऱ्यांना किंवा संगीत ऐकताना हरवून जाणाऱ्यांसाठी अगदी योग्य आहे. हे इयरग्रुव्हज टाइप- सी केबल आणि उत्पादनातील त्रुटींसाठी १८० दिवसांच्या वॉरंटीसह येतात. इयरग्रुव्हज काळा व पांढरा अशा दोन रंगात आणि २४९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आले आहेत. हे उत्पादन आघाडीच्या रिटेल दालनांमध्ये खरेदी करता येऊ शकते.