शिंदे गटाला ‘बाळासाहेबाची शिवसेना’ हे नाव मिळालं; उद्धव ठाकरेंना कोणतं नाव मिळाले?

मुंबई:  आत्ताच्या घडीची आणि राज्याच्या राजकारणातील महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे अनेक दिवसांचा शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल या चिन्हाची मागणी केली होती. हे धार्मिक चिन्ह असल्याने हे देता येत नाही. तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूतील पक्षाचं चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे.

दुसऱ्या बाजूला  एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.