‘जूलाब पाटील परत ओकला, हा माणूस कधीच शुद्धीत नसतो’

मुंबई :  सध्या राज्यभरात नगरपंचायत निवडणूकींची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली आहे.

गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केलाय.

गुलाबराव पाटील यांच्या या बेताल वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार संचार घेतला आहे. ‘जूलाब पाटील परत ओकला, म्हणे मतदारसंघाचे रस्ते हेमा मालिनीच्या गाला सारखे आहे. हा माणूस कधीच शुद्धीत नसतो तरी पण नशेत असो किंव्हा शुद्धीत असो महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही.’ असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.