वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले; निलेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण झाले. मात्र अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. अजित पवारांचे भाषण न झाल्याने पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले. त्यांनी हाताने इशारा करुन याबाबत सूचना केली होती. पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.

दरम्यान, देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान (Insult) असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असल्याने त्यांना बोलू द्यावं अशी विनंती पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. पण पीएमओने (PMO) त्याला काही उत्तर दिलं नाही. हे अतिशय वेदनादायी आणि अपमानकारक आहे. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आहेत. त्यांना न बोलू देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हे जे झालं ते अयोग्य आहे.असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, आता या साऱ्या प्रकरणावर व्यक्त होतना निलेश राणेंनी (Nilesh Rane) सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलायला संधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांची भलतीच तडफड झाली पण वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाचे कौतुक करणं त्यांना सुचलं नाही. खासदार सुळे TV फुटेज बघा, हजारो वारकरी (Warakari) या कार्यक्रमाला आले होते त्या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम तुम्ही केले.असं राणे यांनी म्हटले आहे.