Vijay Shivtare | आतापर्यंत दुश्मनी पाहिली, आता अजितदादांसोबतची दोस्ती पाहा

Sunetra Pawar Meets Vijay Shivtare | राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक होत आहेत. यातच देशातील सर्वात चर्चेत आलेल्या बारामती लोकसभा (Baramati LokSabha 2024) मतदारसंघात सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचा सामना होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणाऱ्या, त्यांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंची भेट सुनेत्रा पवारांनी घेतली. सुनेत्रा पवार या पुरंदरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विजय शिवतारे यांच्या सासवडच्या घरी भेट दिली.

बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होणार असल्याच्या चर्चा असताना विजय शिवतारे आक्रमक झाले होते. त्यांनी अजित पवारांंविरोधी भूमिका घेत बारामतीतून निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि सुनेत्रा पवार यांना पाठींबा दर्शवला. यानंतर आता सुनेत्रा पवार विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने या भेटीकडे सर्वांच्याच नजरा खिळल्या.

सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही विजय शिवतारेंची भेट घेण्यासाठी पोहोचले. यावेळी आतापर्यंत अजितदादांनी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा असं विजय शिवतारे सुनेत्रा पवारांना म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !