Sudhakar Badgujar | माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल झाला; सुधाकर बडगुजर यांचा थयथयाट

Sudhakar Badgujar Viral Video Case : नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) पार्टी केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आडगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे प्रकरण गाजले होते. आमदार नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ विधानसभेत दाखवले होते. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.

यानंतर सलिम कुत्ता पार्टी प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची अनेक वेळा पोलिसांनी चौकशी केली गेली होती. या प्रकरणात पोलिसांनी पवन मटाले, रवी शेट्टी, सरप्रीतसिंग यांच्यासह आतापर्यंत 17 ते 18 जणांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता अखेर सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दरम्यान, यावर आता खुद्द बडगुजर यांची प्रतिक्रिया आली आहे. “राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल 8 वर्षांनी गुन्हा दाखल झाला असून, यासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. मात्र, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा केलाय का?, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Loksabha Election: भाजपकडून लोकसभेसाठी २३ निवडणूक निरीक्षकांची घोषणा, वाचा संपूर्ण यादी

Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Pankaja Munde | पंकजा मुंडे लोकसभा निवडणूक लढणार नाहीत? भाजपच्या ‘त्या’ यादीत आलं नाव