प्रतिभा असावी तर अशी! पार्ले-जी बिस्किटांपासून तरुणाने बनवली राम मंदिराची प्रतिकृती, VIDEO

Ram Temple Replica From Parle-G Biscuit:- अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची उलटी गिनती सुरू झाली आहे. अवघा देश राममय झाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी करोडो राम भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अनेक रामभक्त अनोख्या पद्धतीने आपली भक्ती दाखवत आहेत. काही जण रामाच्या दर्शनासाठी पायी निघाले, तर काहींनी राम मंदिर थीम असलेला केक तयार करून आपली भक्ती दाखवली. यातच पश्चिम बंगालमधील एका तरुणाने असा पराक्रम केला आहे की लोक आता त्याचे गुणगान गाताना दिसत आहेत.

या तरुणाने 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर करून राम मंदिराची अप्रतिम प्रतिकृती बनवली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. छोटन घोष यांनी सांगितले की, राम मंदिराची 4 बाय 4 फुटांची प्रतिकृती बनवण्यासाठी त्यांना पाच दिवस लागले. मात्र, या प्रतिकृतीमध्ये बिस्किटांशिवाय थर्माकोल, प्लायवूड, गोंद यांचाही वापर करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण बिस्किटांपासून मंदिराची प्रतिकृती बनवताना दिसत आहे.

राम मंदिराच्या या अतिशय सुंदर प्रतिकृतीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @durgapur_times नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये सांगितले की, मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी 20 किलो पार्ले-जी बिस्किटांचा वापर करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी शेअर केलेली ही व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर चांगलीच खळबळ माजवत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास दोन कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर 26 लाखांहून अधिक युजर्सनी तो लाइक केला आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये नेटिझन्स तरुणाचे कौतुक करत आहेत.

एका युजरने कमेंट केली आहे, खूप छान. अप्रतिम प्रतिभा भाऊ. तर इतर म्हणतात, मी तुझ्या प्रतिभेचे कितीही कौतुक केले तरी कमीच होईल. मात्र, अनेक युजर्सनी तरूणाला सल्ले देत लिहिले आहे की, सर्व काही ठीक आहे, पण अशा प्रकारे अन्न वाया घालवू नका.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?