‘निसर्गाच्या नियमानुसार पुरुष महिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत, स्त्रीने पुरुषाने दिलेले आदेश पाळले पाहिजेत’    

Afghanistan Minister On Woman:  अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या (Taliban Government) कार्यवाहक उच्च शिक्षण मंत्री नेदा मोहम्मद नदीम (Neda Mohammad Nadim) यांनी रविवारी (1 ऑक्टोबर) महिलांविरोधात वक्तव्य केले. बागलान विद्यापीठातील एका मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, इस्लामिक शरिया कायद्यानुसार स्त्री-पुरुष समान नाहीत. काबुल न्यूज एजन्सी टोलोच्या वृत्तानुसार, त्यांनी सांगितले की, आम्ही महिलांशी संबंधित तालिबानी व्यवस्था नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहोत.

नेदा मोहम्मद नदीम यांनी पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधताना सांगितले की, पाश्चिमात्य देश स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करतात, मात्र दोघेही समान नाहीत. तालिबान सरकारने महिलांच्या विरोधात उचललेल्या पावलांचे त्यांनी समर्थन केले. महिला आणि पुरुष समान नाहीत यावर त्यांनी बैठकीत भर दिला. अल्लाहने स्त्री-पुरुषांमध्ये फरक केला आहे असं ते म्हणाले.

नेदा मोहम्मद नदीम यांनी सांगितले की, निसर्गाच्या नियमानुसार पुरुष महिलांपेक्षा श्रेष्ठ आहेत. स्त्रीने पुरुषाने दिलेले आदेश पाळले पाहिजेत आणि स्त्रियांनी त्यांच्या अधीन रहावे. महिलांनी पुरुषांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले पाहिजे. दरम्यान, तालिबान सरकारने नियुक्त केलेल्या मंत्र्याने विज्ञान विषय महिलांसाठी योग्य नसल्याचा युक्तिवाद केला. यावेळी विद्यापीठांमध्ये शिकवले जाणारे हे विषय इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात, असा युक्तिवादही शिक्षण मंत्र्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण