World Cupच्या इतिहासात किती देशांनी जिंकली ट्रॉफी? भारताला कितीवेळा मिळाले यश? जाणून घ्या संपूर्ण माहिती

World Cup Trophies Winners List 1975 To 2019 History: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी (ODI World Cup 2023) उलटी गिनती सुरू झाली आहे. भारताच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, ज्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळणार आहे, त्यामुळे भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे.

यादरम्यान टीम इंडियाची नजर 2011 नंतरच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यावर असेल. 1975 ते 2019 पर्यंत अनेक संघांनी विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे. पहिला विश्वचषक 1975 मध्ये इंग्लंडमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये वेस्ट इंडिजने विजयाने सुरुवात केली होती आणि 48 वर्षांनंतर, यावेळी वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमध्ये दिसणार नाही.

अशा परिस्थितीत, या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की कोणत्या देशांनी विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे आणि कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे.

विश्वचषक जिंकणारे संघ-

1975 वेस्ट इंडिज
1979- वेस्ट इंडिज
1983- भारत
1987- ऑस्ट्रेलिया
1992- पाकिस्तान
1996- श्रीलंका
1999- ऑस्ट्रेलिया
2003-ऑस्ट्रेलिया
2007- ऑस्ट्रेलिया
2011- भारत
2015- ऑस्ट्रेलिया
2019- इंग्लंड

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा