ॐकार- प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या प्रभात फेरीला उत्तम प्रतिसाद

धायरी – स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ॐकार- प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूल मधे नुकतीच प्रभात फेरी काढण्यात आली होती. या प्रभात फेरीद्वारे शालेय परिसरात जाऊन जनजागृती करण्यात आली. या प्रभात फेरीचे विशेष म्हणजे २ ते १० वर्ष वयोगटातील बालकांनी यात सहभाग नोंदविला. यावेळी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देऊन भर पावसात परिसर दुमदुमून टाकला.

दरम्यान, यावेळी शिक्षक वृंद व पालकांनी या प्रभात फेरीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन, मुलांचा उत्साह वाढविला. तसेच सौ. कानिटकर मॅडम यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काढलेल्या प्रभात फेरीमूळे देशभक्तीची जाणीव देशभरात कशी निर्माण झाली होती याची माहीती दिली. शाळेच्या संस्थापिका सौ. कानिटकर सगृहगान सादर करून सर्वांची मने जिंकून घेतली. अशा रितीने ॐकार- प्री-प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या प्रभात फेरीमुळे शालय परिसर दुमदुमुन गेला.