रामलीला मैदानावर रंगणार कब्बडीचा महासंग्राम; राज्यातील सर्वोत्कृष्ट वीस संघांचा सहभाग

Kabaddi : दरवर्षीप्रमाणे यंदाही वसुंधरा फाउंडेशन तर्फे कबड्डी चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा 15 ते 17 डिसेंबर दरम्यान रामलीलावर मैदानावर कबड्डीचा महासंग्राम रंगणार आहे. कबड्डीसह बॉलीवूड-मराठीतील कलाकार आणि कबड्डीचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू हिंगोलीकरांच्या भेटीला येणार आहे, अशी माहिती वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्ष मनीषा काटकर- पायगव्हाणे यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, वसुंधरा फाउंडेशन मागील तीन वर्षापासून 132 केवी अर्थातच 132 गावांची ओळख कबड्डी व्हिलेज म्हणून करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या माध्यमातून राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू उदयास येतील. यावर्षी पुणे, धुळे, कोल्हापूर, रायगड, मुंबई, नांदेड, अहमदनगर, ठाणे, कल्याण, इस्लामपूर, हिंगोली इत्यादी जिल्ह्यातील अव्वल संघ सहभागी होणार आहेत.

आज होणार उद्घाटन
आज उद्घाटन समारंभाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे सीईओ संजय दैने, अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार होनप्पा गौडा, पोलीस अधीक्षक जी श्रीधर आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त आणि आशियाई सुवर्णपदक विजेत्या स्नेहल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ग्रँड उद्घाटनाला कॉमेडीचा बुस्टर डोस
वसुंधरा फाउंडेशन आयोजित कबड्डी चषक 2023 च्या ग्रँड ओपनिंगला हिंगोली करांना कॉमेडीचा बूस्टर डोस मिळणार आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री तेजा दिवेकर हे खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित त्यांना सुर नवा ध्यास नवा या मालिकेतील फेम जितेंद्र तुपे आणि इंडियन आयडॉल मराठी फेम श्वेता दांडेकर यांचा स्वर संगीत ऐकायला मिळणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा
तीन दिवस चालणाऱ्या कबड्डी चषक 2023 स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला दोन लाख रुपये, द्वितीय संघाला दीड लाख रुपये, तृतीय संघाला एक लाख रुपये आणि चतुर्थ संघाला एक लाख रुपये धनादेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई खेळाडू, उत्कृष्ट पकड आणि मॅन ऑफ द डे यांनाही रोख रक्कम आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सर्व सामने बघा लाईव्ह
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील सर्व सामने वसुंधरा फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक आणि यूट्यूब चैनलवर बघायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-