IND vs ENG | भारतीय संघाची ताकद झाली निम्मी! ‘हा’ गेमचेंजर खेळाडू तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक बाहेर

IND vs ENG | भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट (Rajkot) येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंड संघाने 2 गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाला विकेट्सची( IND vs ENG ) गरज असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताच भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली.

बातमी अशी आहे की रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) कुटुंबात अचानक अडचण निर्माण झाल्यामुळे त्याला सामन्यात मधूनच बाहेर पडावे लागत आहे. बीसीसीआयने आपल्या एक्स अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली. अश्विनउर्वरित तीन दिवसांच्या खेळात तो संघाचा भाग बनू शकणार नाही.

बीसीसीआयने आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, या कठीण परिस्थितीमध्ये भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि संघातील सर्व खेळाडू, सहकारी कर्मचारी रविचंद्रन अश्विनच्या पाठिशी आहेत. खेळाडूंच्या कुटुंबियांना आम्ही पाठिंबा देतो आणि त्यांचे आरोग्य आणि खुशाली आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. या आव्हानात्मक परिस्थितीतून अश्विन आणि कुटुंबिय बाहेर पडतील, अशी आशा करुयात, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयच्या संकेतस्थळावर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?