मागील महिन्यात आम्हीपण एक उंच हंडी फोडली, त्यासाठी 50 थर लावले होते – मुख्यमंत्री

Thane – राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या थाटात सर्वत्र भव्य, दिव्य अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आज ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी (Dahi handi) उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून जोरदार टोलेबाजी केली.

दीड महिन्यापूर्वी आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आबी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादानं सर्वात मोठी हंडी फोडली, आम्ही 50 थर लावले होते,’ असं एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) म्हटलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी एकदा ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा बोलून दाखवल्याचं त्यांच्या बहिणीनं सांगितल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.