‘काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल’, भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा

नवी दिल्ली: राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी (31 मे) दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. जयंतीच्या या कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

“मी भाजपची आहे, पण भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईल. आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता चर्चांना उधाण आले आहे.