‘पंचायत’ फेम अभिनेत्री आंचल तिवारीचा कार अपघातात मृत्यू, आणखी ८ जणांचाही गेला जीव

Actress Aanchal Tiwari Car Accident: भोजपुरी इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. मोहनिया पोलीस स्टेशन हद्दीतील देवकाली गावाजवळ रविवारी 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात नऊ जण ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोठ्या कष्टाने मृतदेह गाडीतून बाहेर काढले. या अपघातात बिहारचा गायक छोटू पांडे याचा मृत्यू झाला आहे. तसेच भोजपुरीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पंचायत फेम आंचल तिवारीलाही (Aanchal Tiwari) या अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत ठार झालेल्या नऊ जणांमध्ये भोजपुरी गायक छोटू पांडे, भोजपुरी अभिनेत्री आंचल तिवारी (Aanchal Tiwari Car Accident) आणि सिमरन श्रीवास्तव यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. जिल्हा पोलिसांनीही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मोहनियाचे डीएसपी दिलीप कुमार यांनी सांगितले की, सोमवारी मृतांची ओळख पटली असून भोजपुरी गायक विमलेश पांडे उर्फ ​​छोटू पांडे यांचाही समावेश आहे. आंचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंग, अनु पांडे, शशी पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे अशी अन्य मृतांची नावे आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

कोण होती आंचल तिवारी?

आंचल तिवारी ही भोजपुरीची उगवती स्टार होती. आंचल ही टिळक नगर, मुंबई, महाराष्ट्राची रहिवासी होती. ती सिने सृष्टीत नुकताच आपला ठसा उमटवू लागली होती. आंचल तिवारी ॲमेझॉन प्राइमच्या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली होती. याशिवाय ती भोजपुरी इंडस्ट्रीत सक्रिय होती. तिने अनेक भोजपुरी गाण्यांना आवाज दिला आहे. तिने मुख्यतः सांस्कृतिक गाणी गायली. बिहारमध्ये जन्मलेली आणि मोठी झालेली आंचल शास्त्रीय गाण्यांसाठी ओळखली जायची.

गायक छोटू पांडेलाही जीव गमवावा लागला

या अपघातात भोजपुरी गायक छोटू पांडे याचाही मृत्यू झाला आहे. भोजपुरी गाण्यांसोबतच त्याने चित्रपटांमध्येही काम केले आणि तो बिहारचा रहिवासी होता. ‘फोन कटरू दूसरा से पत गयालू का’ या गाण्याने त्याला प्रसिद्धी मिळाली होती. त्याने ‘सबकार दुलारुआ हवन’ या भोजपुरी सिनेमातही काम केले होते.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही