Sidhu Moosewala’s mother pregnant | दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची आई वयाच्या ५८व्या वर्षी दुसऱ्या बाळाला देणार जन्म

Sidhu Moosewala’s mother pregnant : पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याची 29 मे 2022 रोजी हत्या झाली होती. लोकप्रिय गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मूसेवाला याच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. सिद्धू मूसेवाला हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

गायकाच्या निधनाच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबासह त्याच्या चाहत्यांचीही ह्रदये तुटली होती. आता बऱ्याच काळानंतर सिद्धू मूसेवालाच्या घरात पुन्हा एकदा आनंदाने दार ठोठावले आहे. पंजाबचा प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धूमूसेवाला याची 58 वर्षीय आई (Sidhu Moosewala) चरण कौर लवकरच आई होणार आहे. ही आनंदाची बातमी त्याच्या कुटुंबीयांनीच शेअर केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दिवंगत गायक सिद्धू मूसेवाला याच्या निधनाच्या वृत्ताने देशभरात शोककळा पसरली होती. मात्र, गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवालाच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं स्वागत होणार असल्याच्या बातमीनं त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं असेल. सिद्धू मूसेवालाची आई चरण कौर गर्भवती असल्याच्या वृत्ताला गायकाचे काका चमकौर सिंह सिद्धू यांनी दुजोरा दिला आहे.

त्यांनी सांगितले की, कुटुंबातील प्रत्येक सदस्य फक्त प्रार्थना करत आहे की, बलकौर सिंग सिद्धू (Sidhu Moosewala Father) यांच्या घरी पुन्हा एकदा आनंद परतावा. सिद्धू मूेसवाला याच्या काकांनी देवाचे आभार मानले आणि त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा हास्याने भरले जाईल असे सांगितले.

रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मूसेवालाची आई मार्च महिन्यात आपल्या मुलाला जन्म देणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिद्धू मूसेवालाच्या पालकांनी गरोदरपणाच्या वृत्तावर बोलण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही