राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे तोडगा काढणार, मराठा आरक्षणप्रश्नी खा. राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला विश्वास

Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न केंद्रस्थानी आलेला आहे. मात्र केंद्र सरकार आणि राज्य सरकार या प्रश्नावर एकत्रितपणे तोडगा काढतील, असा विश्वास शिवसेना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी व्यक्त केला.

शिवसैनिकांच्या वात्सल्यमूर्ती मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापति नीलमताई गोऱ्हे व शिवसेनेचे लोकसभेतील गटेनेते खा. राहुल शेवाळे हे शिवाजी पार्क येथे आज बुधवारी शेकडो शिवसैनिक व महिला आघाडी सोबत उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर मत व्यक्त केलं.

मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरंगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं उपोषण सुरू आहे. या संपूर्ण मुद्द्याबाबत सरकार संवेदनशील आहे. सगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकार लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कुणबी मराठा आरक्षणाबाबत जी मागणी आहे ती पूर्ण करण्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जर मराठा आरक्षणाचा प्रश्न राजीनाम्याने सुटणार असता तर मागेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला असता. असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाला एक वेगळं वळण आले आहे. आणि झालेल्या लाठीचार्जबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी देखील मागितली आहे. कुणबी समाजाची जी मागणी आहे त्यासाठी देखील बैठक घेण्यात येत आहे. एकूणच केंद्र सरकारने मराठा आरक्षणावर लक्ष द्यावं. हा विषय लवकर सुटावा यासाठी केंद्र सरकारकडे मी शिवसेनेचा गटनेता म्हणून जाणार आहे.राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र काम केल्याने मराठा आरक्षणावर नक्कीच मार्ग निघेल, असा विश्वास खा.राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde