‘त्या’ कीर्तनकाराचे व्हिडीओ मला प्राप्त झाले आहेत; कारवाईची मागणी करणार – देसाई

औरंगाबाद : राज्यभरात एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘नको तसला’ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून कीर्तन करतात.

व्हिडिओतील किर्तनकार महाराज हे जिल्ह्यातील नामवंत किर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे. दोघांचे युट्यूबवर (Youtube) मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. मात्र, त्यांचे नको त्या अवस्थेतील दोन व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा भक्तांना मोठा धक्का बसला आहे .

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai) या एका प्रसिद्ध कीर्तनकारांचा भांडाफोड करणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. हा कीर्तनकार कोण, त्याचे नाव लवकरच समजणार आहे, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे. एका प्रतिष्ठित कीर्तनकाराचे, कीर्तनकार महिलेबरोबर संभोग करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले असून ते मला प्राप्त झाले आहेत, कीर्तनकारांच्या नावासहित कारवाईची मागणी करणार आहे असे देसाई यांनी म्हटलं आहे.  देसाई यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.