योगी सरकारचा धाडसी निर्णय; हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

Yogi Government: उत्तर प्रदेशातील योगी सरकारने देशहिताचा विचार करून राज्यात हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. राज्यात तेल, साबण, टूथपेस्ट यासारख्या हलाल प्रमाणित शाकाहारी उत्पादनांच्या विक्रीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे.

शनिवारी संध्याकाळी, यूपी सरकारने राज्याच्या हद्दीत हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला. हलाल प्रमाणपत्रामुळे देशातील जातीय सलोखा नष्ट होत असून त्याचा फायदा देशविरोधी शक्तींना होत आहे. अशा बेकायदेशीर प्रमाणपत्रामुळे हे लेबल नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या विक्रीला खीळ बसली आहे असे सांगण्यात येत आहे.

ज्या शाकाहारी पदार्थांची अजिबात गरज नाही त्यांना हलाल प्रमाणपत्र दिले जात आहे. कायद्यानुसार अन्न उत्पादनांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यासाठी ISI आणि FSSAI या अधिकृत संस्था असून इतर कोणत्याही अधिकृत संस्था नाहीत. असे योगी सरकारचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या-