पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा; एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर निलेश राणेंचा सल्ला

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी आज धडक दिली .आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहे. सत्ताधारी नेते हे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला भाजपनेते निलेश राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून?? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा. असं राणे म्हणाले आहेत.