पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या ‘कोअर कमिटी’ने फेटाळला; अजित पवार झाले नाराज?

Sharad Pawar Resigns: ‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीने शरद पवारांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान,विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे निवड समितीच्या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा आहे. शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अजित पवार एकमेव नेते होते ज्यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याला समर्थन दिलं होतं. मात्र आता निवड समितीने हा निर्णय फेटाळल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे.  मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक संपन्न झाल्यानंतर अजित पवार माध्यमांशी न बोलता थेट निघून गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.