गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही; आदित्य ठाकरेंची डरकाळी

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० पेक्षा जास्त शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray) हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

दरम्यान, हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि पुन्हा निवडून येवून दाखवा असे आव्हान देत गद्दारांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही, असा इशार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना दिलाय. आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला.

सर्व काही देऊन देखील शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. परंतु, या बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय. बंडखोरी केलेले 15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. परंतु, गद्दारांना क्षमा नाही. अडीच वर्षे तुमचे हिंदुत्व कुठे होते? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.