हद्द झाली! चक्क शाळेच्या पटांगणात गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन

Gautami Patil Show: नृत्यांगणा गौतमी पाटील (gautami patil) हिचे कार्यक्रम नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहताात. आजवर महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम गौतमीचा कार्यक्रम झाला आहे. कधी तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली आहे, तर कधी ती बैलासमोर नाचली आहे. मात्र आता गौतमीने विद्याचे घर अर्थातच शाळेत नृत्य केल्याने (Gautami Patil Dance In School) तिच्या अडचणी वाढू शकतात.

दिंडोरी तालुक्यातील वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्यात आलं होतं. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठिकाणी ही तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता. विविध मद्याच्या ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. अशी माहिती साम टीव्हीने दिली आहे.

हा कार्यक्रम शांततेत पार पडला असला तरीही शाळेच्या पटांगणात गौतमीचा क्रार्यक्रम आयोजित केल्याने आयोजकांवर कारवाई होऊ शकते.