भारत शत्रू देश नाही प्रतिद्वंद्वी आहे; ट्रोल झाल्यानंतर पीसीबी अध्यक्ष झका अश्रफ यांनी दिले स्पष्टीकरण

Zaka Ashraf: भारताला शत्रू देश म्हणणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष झका अश्रफ (Zaka Ashraf) यांना त्यांच्याच देशातील लोकांनी आरसा दाखवला. त्यानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे.

अश्रफ म्हणाले होते, “आम्ही आमच्या खेळाडूंना हे करार प्रेमाने आणि आपुलकीने दिले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात कधीच खेळाडूंना एवढी मोठी रक्कम दिली गेली नव्हती. मी दिलेली आहे. आमचे सर्व खेळाडूंचे मनोबल उंचावले पाहिजे. उंच उडा. जेव्हा ते शत्रू देशात किंवा कोणत्याही ठिकाणी सामना खेळायला जातात तेव्हा त्यांच्यात उत्साह असला पाहिजे.’

मात्र अश्रफ यांची ही बेताल टिप्पणी लवकरच व्हायरल झाली आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांनाही त्यांची वृत्ती आवडली नाही. परिणामी अश्रफ यांनी शुक्रवारी याबाबत स्पष्टीकरण दिले. पीसीबीने स्पष्टीकरण देताना निवेदनात म्हटले आहे की, ‘हैदराबाद विमानतळावर आयोजित केलेल्या स्वागत समारंभातून हे प्रेम दिसून आले. अशा स्वागत समारंभाचे आयोजन केल्याबद्दल झका अश्रफ यांनी वैयक्तिकरित्या भारतीयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानात उतरतात तेव्हा ते शत्रू म्हणून नव्हे तर पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे असतात.’

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा