AUS विरुद्धच्या सामन्यासाठी गावस्करांनी निवडली INDची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी

Sunil Gavaskar Picks India’s Playing Xi: भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. पण माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग 11ची (India Playing Xi) निवड केली आहे.

यूट्यूबवरील स्टार स्पोर्ट्स शोमध्ये सुनील गावस्कर यांनी भारताच्या प्लेइंग 11ची निवड केली तेव्हा इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना त्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. याशिवाय महान भारतीय फलंदाजानेही अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरवर विश्वास व्यक्त केला नाही. गावसकर यांनी वेगवान गोलंदाजांमध्ये शमी, बुमराह आणि सिराज या त्रिकुटावर विश्वास व्यक्त केला.

सुनील गावस्कर यांनी भारताच्या टॉप ऑर्डरमध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. गावसकर म्हणाले की, कोणत्याही संघात टॉप-3 फलंदाज महत्त्वाचे असतात. सलामीवीरांना चांगली सुरुवात मिळाली तर इतरांना खेळण्याची लय मिळते. त्यामुळे सलामीची जोडी महत्त्वाची आहे.

सुनील गावस्कर यांनी मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि केएल राहुलवर विश्वास व्यक्त केला. अष्टपैलू खेळाडूंमध्ये लिटिल मास्टरने रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांची निवड केली. गावसकर यांनी कुलदीप यादवची फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली तर रविचंद्रन अश्विनकडे दुर्लक्ष केले.

सुनील गावसकरचे प्लेइंग 11 खालीलप्रमाणे आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा