PDCC Election : १४ जागा बिनविरोध तर ६ जागांसाठी अजित पवारांची लागणार कसोटी

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) संचालक पदाची निवडणूक सुरु आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच इच्छुक असल्याचे दिसत आहे. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सातवेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भुषवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत, तर पुणे जिल्ह्यातील 6 जागांसाठी मतदान सुरु आहे. पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.