भाजपाचे झुंजार नेतृत्त्व हरपले! चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे: पिंपरी चिंचवडमधून अतिशय दुख:द बातमी पुढे येत आहे. चिंचवडचे भाजपा आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे आज सकाळी निधन झाले (Laxman Jagtap Passes Away) आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रदीर्घ आजारामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लक्ष्मण जगपात ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली.

गेल्या महिन्यातच भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचं दीर्घ आजाराने निधन झालं होतं. त्यातच आज लक्ष्मण जगताप यांनी देखील अखेरचा श्वास घेतल्याने पुणेकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.