‘इंदूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्याचा मोठा लाभ होणार’

Nitin Gadkari : देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे पसरवले जात असून त्यामुळे दळणवळण सोयीचं झालं आहे.नव्याने मंजूर झालेल्या इंदूर-जबलपूर या राष्ट्रीय महामार्गामुळे विदर्भासह हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्याचा मोठा लाभ होणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हिंगोली इथल्या रामलीला मैदानावर महामार्गांच्या रस्ते लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

हिंगोली जिल्हा हळदीसाठी प्रसिद्ध असून तिथं शंभर एकर जागेत वाहनतळ उभारला जाणार असून त्यात हळद क्लस्टरसाठी मोठा वाव असल्याचं सांगत हळदीसाठी हिंगोली जिल्हा जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.भेंडेगाव उड्डाण पुलासाठी 75 कोटी रुपयांचा निधी,बासंबा फाटा पुलासाठी 20 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही यावेळी गडकरी यांनी केली.संपर्कमंत्री अब्दुल सत्तार,खासदार हेमंत पाटील,खासदार भावना गवळी,आमदार संतोष बांगर आदी यावेळी उपस्थित होते.