PM Narendra Modi यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली, हॉस्पिटलमध्ये दाखल

Heeraben Modi admitted to Hospital: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांच्या आई हिराबेन मोदी (heeraben modi) यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन मोदी यांना अहमदाबादमधील (Ahmedabad News) यूएन मेहता रुग्णालयात (UN Mehata Hospital, Ahmedabad) दाखल करण्यात आले आहे. हीराबेन मोदी 100 वर्षांच्या आहेत आणि यावर्षी जून महिन्यात त्यांनी त्यांचा 100 वा वाढदिवस साजरा केला.

अहमदाबादस्थित यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरने पंतप्रधान मोदींच्या आई हीराबेन मोदी यांचे मेडिकल बुलेटिन जारी केले आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईला अहमदाबादच्या यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात अहमदाबादला पोहोचू शकतात, जिथे त्यांची आई यूएन मेहता रुग्णालयात दाखल आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे देखील अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयात पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री आधीच हॉस्पिटलमध्ये हजर आहेत.

नरेंद्र मोदींची आई हीराबेन मोदी गांधीनगरमध्ये राहतात आणि जेव्हाही पीएम मोदी गुजरातमध्ये जातात तेव्हा ते त्यांच्या आईला नक्कीच भेटतात. गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नुकतीच आपल्या आईची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या वर्षाच्या सुरुवातीला 27 ऑगस्ट रोजी त्यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी त्यांच्या हिराबेन यांची भेट घेतली होती. साबरमती नदीवरील अटल पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी अचानक आईला भेटण्यासाठी गांधीनगरमध्ये पोहोचले होते.