राज ठाकरेंच्या सभेची पुण्यातील जागा ठरली, पोलिसांचीही परवानगी

पुणे – राज ठाकरेंच्या  पुण्यातल्या सभेचा  मार्ग मोकळा झालाय.आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची तोफ धडाडणार आहे. औरंगाबाद, ठाण्यानंतर आता पुण्यात (Pune) राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील राज ठाकरे यांच्या सभेची जागा ठरली. डेक्कन नदी पात्रात (Deccan River) होणार सभा होणार आहे.

राज ठाकरेंची पुण्यात सभा 21 मे या दिवशी होणार आहे. डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे.  15 मे रोजी राज यांच्या सभेबाबत हे पत्र दिले होते. काल येथील जागेची पाहणी करण्यात आली आणि आता परवानगी (Permission) मिळाल्याने नदी पत्रात राज ठाकरे यांची सभा होणार आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे शहरात सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर सरचिटणीस अजय शिंदे (Ajay Shinde) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पुण्यात मनसेची पक्षसंघटना मजबूत आहे. मात्र गेल्या महिन्यात भोंग्याच्या (Loudspeaker)  भूमिकेबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून वसंत मोरे (Vasant More) यांना शहराध्यक्षपदावरून काढल्यानंतर पुण्यामध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळतेय. त्यावर या दौऱ्यामध्ये पडदा पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील निवडणुका यासंदर्भात देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटप होण्याची शक्यता आहे.