१३वी ‘भारतीय छात्र संसद’चे माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Bharatiy Chatra sansad : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसदेचे (Bharatiy Chatra sansad)दि.१० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे तेरावे वर्ष आहे.

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे.

१३व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि.१० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता भारताचे माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या शुभहस्ते होणार आहे. जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार व लेखक प्रा.रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता या संसदेचा समारोप होणार आहे. प्रेरणादायी व्याखाते डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि माजी प्रशासकीय अधिकारी व लोकसत्ता आंदोलनाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.छात्र संसदेचे या उद्घाटन व समारोप समारंभा खेरीज या संसदेमध्ये ६ सत्रे आयोजित केली आहे.

पहिले सत्र बुधवार दि. १० जानेवारी रोजी दुपारी ३.०० वाजता सुरू होणार आहे. राजकारणातील युवा नेतृत्व-वक्तृत्व किंवा वास्तव या विषयावर उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतिश महाना, खासदार चिराग पासवासन व बीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ता शहजाद पुनावाला आपले विचार मांडतील.

यावेळी तसेच कर्जत जामखेड येथील आमदार रोहित राजेंद्र पवार आणि विधानपरिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांना आदर्श युवा विधायक सन्मान पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच पुरस्काराने पंजाब येथील अ‍ॅड. राजबलविन्दर सिंग, महाराष्ट्रातील सौ. यशोधराराजे शिंदे आणि उत्तर प्रदेश येथील प्रियंका तिवारी आणि राजस्थान येथील निरू यादव यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
दुसरे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वा.सुरू होणार आहे.

युगांतर-संक्रमणातील तरूण या विषयावर कर्नाटक येथील विधानपरिषदेचे सभापती बसवराज होराट्टी, व्हरमौंट विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरिमला, अध्यात्मिक गुरू व लेखक स्वामी मुकुंदानंदा आणि प्रसिद्ध इतिहासकार डॉ. विक्रम संपत आणि यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

बिहारचे आमदार चेतन आनंद यांचा आदर्श युवा विधायक सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.तिसरे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.सुरू होणार आहे.लोकशाही २.० एआय आणि सोशल मीडिया गेम कसे बदलत आहेत. या विषयावर राज्याच्या उच्च व तांत्रिक शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील , धोरण सल्लागार आणि संशोधक डॉ. शेहला रशीद, आयएनसीचे राष्ट्रीय प्रवक्ता गुरदीप सिंग सप्पल, बीजेवायएम ११ सोशल मीडियाच्या अपूर्वा सिंग, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर फरीद हे विचार मांडतील.

यावेळी हरियाणाच्या हिसार, आदमपूर येथील भाजपचे आमदार भाव्या बिश्नोई यांनाआदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.चौथे सत्र गुरूवार दि.११ जानेवारी रोजी सकाळी ३.०० वा.सुरू होणार आहे. आमच्या संस्कृतीत लोककलेची शक्ती या विषयावर उत्तर प्रदेश विधान परिषदचे अध्यक्ष कुंवर मानवेंद्र सिंह, गीतकार, कवी, संवाद लेखक आणि पटकथा लेखक मनोज मुंतशीर, भारतीय गायिका मालिनी अवस्थी हे विचार मांडतील.तसेच बिहारच्या मधुबनी येथील हरलाखीचे आमदार सुधांशू शेखर व उत्तराखंडच्या बागेश्वर कपकोटचे आमदार सुरेश गरिया यांना आदर्श युवा विधायक पुरस्कारानेे गोरविण्यात येईल.

पाचवे सत्र शुक्रवार दि. १२ जानेवारी सकाळी ९.१५ वा. सुरू होणार आहे. डेटा, विविधता आणि लोकशाही- कास्ट जनगणना दुविधा या विषयावर मध्य प्रदेश विधानसभेचे माजी सभापती गिरीश गौतम, तमिळनाडू व पाँडेचेरीचे एआयसीसीचे प्रभारी डॉ. अजॉय कुमार आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीचे संचालक डॉ. संजय कुमार, खासदार प्रा. मनोज कुमार झा, ओडिशा आपले विचार मांडतील.तसेच झारखंडच्या धनबाद येथील झरियाचे आमदार पूर्णिमा निरज सिंह आणि नोएडा येथील विधानसभा सदस्य पंकज सिंह यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

सहावे सत्र शुक्रवार दि. १२ जानेवारी सकाळी ११.३० वा. सुरू होणार आहे. आपण चंद्रावर उतरलो, पण जमिनीवर महिला सुरक्षित आहेत ? या विषयावर पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान, मुंबई उच्च न्यायालयाच्या वकील, (महिला हक्क आणि लैंगिक समानता) कार्यकर्त्या अ‍ॅड. आभा सिंह, भारत सरकारच्या एरोनॉटिकल सिस्टम्स (एएस), संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या माजी महासंचालक व प्रतिष्ठित शास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजिया खान आणि राज्यसभेच्या माजी खासदार प्रसिद्ध अभिनेत्री व पार्श्वगायिका रूपा गांगुली हे विचार व्यक्त करतील.
उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या आमदार डॉ. सुरभी व मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या आमदार मनिषा सिंग यांना आदर्श युवा विधायक पुरस्काराने गौरविण्यात येईल.

भारतीय छात्र संसदेची प्रमुख वैशिष्टये :
-२९ राज्यांतील ४५० विद्यापीठांतील ३० हजार महाविद्यालयातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग. महाविद्यालयांच्या पातळीवर विद्यार्थ्यांची चाचणी होऊन त्यापैकी १० ते १२ हजार विद्यार्थ्यांना या छात्र संसदेत प्रत्यक्ष सहभागी करुन घेतले जाते.
-२०० विद्यापीठातील ९० हजार विद्यार्थ्यांचा वेबकास्टिंगद्वारे सहभाग.
– भारतातील ६ राज्यातील विधानसभांच्या सभापतींचा सहभाग.
– भारतातील ६ राज्यातील संसदीय कार्यमंत्र्यांचा सहभाग.
– भारतातील ६ विविध विद्यापीठातील कुलगुरूंचा सहभाग
– निरनिराळ्या राज्यातील आणि विविध पक्षातील तरुण आमदारांचा सत्कार.
– आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार व आदर्श युवा विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे.
– आदर्श उच्च शिक्षित युवा सरपंच सन्मान व आदर्श युवा आध्यात्मिक गुरू सन्मान सुध्दा देण्यात येणार आहेत.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रवी. चिटणीस, पं. वसंतराव गाडगीळ, डाॅ, मिलिंद पांडे, डाॅ. सुधाकर माया परिमल, डाॅ. अंजली साने, डाॅ. महेश थोरवे, व डॉ. गणेश मंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर माहितीसाठीwww.bharatiyachhatrasansad.org या संकेतस्थळांना भेट द्यावी.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”