शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ?

मुंबई – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) नुकतेच औरंगाबादच्या दौऱ्यावर होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या कबरीवर (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले.

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्थ झाले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, आता  मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (MNS spokesperson Gajanan Kale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे. शिवरायांच्या भूमीत औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय ?, असा सवाल उपस्थित करत जमीनदोस्त करा हे थडगं… म्हणजे या अवलादी तिथे माथा टेकायला येणार नाहीत, अशी मागणी गजानन काळे यांनी केली आहे. तसेच माननीय बाळासाहेब ठाकरेही (Balasaheb Thackeray) हेच म्हणाले होते, बाळासाहेबांचे काहीच ऐकायचे नाही आहे का ?, नाही तरी औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरावरून सरळ सरळ पलटी मारली आहेच, असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.