विनायक आंबेकर यांच्यावर कोणी हल्ला केला हे पोलिसांनी शोधून काढावे – राष्ट्रवादी

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते विनायक आंबेकर(Bjp spokeperson vinayak ambekar) यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला आणि ती लोकं राष्ट्रवादीशी(ncp) संबंधित आहेत असा आरोप भाजपच्या(bjp) काही नेत्यांनी केलेला आहे.आंबेकर यांच्यावर कोणी हल्ला केला हे पोलिसांनी शोधून काढावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे (ncp spokeperson mahesh tapase)यांनी केली आहे.

ते म्हणाले, अनेक वेळा भारतीय जनता पार्टीची ट्रोल आर्मी समाज माध्यमांवर पवार कुटुंबातील(pawar family) व्यक्तीच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरील शब्दांचा प्रयोग करून पोस्ट निर्माण करत असतात. या सर्व गोष्टीचा मुकाबला संयमाने आम्ही करतो. विचारांची लढाई ही विचारांनीच केली पाहिजे ही शिकवण खुद्द पवार साहेबांची(sharad pawar) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांची सत्य व अहिंसा या तत्वांवर चालणारी पार्टी असून अशा प्रकारच्या हल्ला हा राष्ट्रवादीच्या माथी मारायचा हा राजकीय षडयंत्र आहे का? अशी शंका निर्माण होते. असं देखील तपासे यांनी म्हटले आहे.